कळी उमलतांना कार्यक्रमात शंकानिरसन

0

भुसावळ । दीपनगर वसाहतीमधील शारदा माध्यमिक विद्यालयामध्ये सकाळी 10 वाजता ‘कळी उमलतांना’ या कार्यक्रमातून स्रीरोग तज्ञ डॉ.मनीषा दावलभक्त यांनी गप्पांच्या माध्यमातून मुलींसोबत संवाद साधला. इयत्ता 7 वी पुढील 148 मुलींनी या अतिशय महत्वपूर्ण अशा कार्यक्रमाचा लाभ घेतला.

रोटरी क्लब दीपनगर आणि शारदा माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दीपनगर केंद्राने हा कार्यक्रम आयोजित केला होता. उपमुख्य अभियंता नितिन गगे अध्यक्षस्थानी तर प्रमुख उपस्थितांमध्ये अधिक्षक अभियंता मनोहर मसराम,कल्याण अधिकारी पंकज सनेर,जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार, शारदा हायस्कूलचे संजय भटकर आणि रोटरी उपाध्यक्ष अजय उबरहांडे उपस्थित होते.

चित्रफितीद्वारे केले शंकांचे निरसन
दिपनगर विद्युत केंद्रात महानिर्मितीचा राज्यस्तरीय उपक्रम अंर्तगत जागतिक महिला दिन निमित्ताने मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांच्या वैद्यकीय समस्या, सांधे दुखी, हाडांची तपासणी,रक्त दाब,रक्त गट आदी तक्रारींबाबत तज्ञांकडून तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले होते. डॉ. मनीषा दावलभक्त यांनी दिलखुलासपणे लहान मैत्रिणींसोबत गप्पा मारल्या.एक एकीला बोलत केल. स्वत:च्या शरीराची काळजी कशी घ्यायची,स्वच्छता बाळगावी,आवश्यक आसने सांगून व्यायामाचे, सूर्य नमस्काराचे महत्त्व सांगितले. संगणकाच्या माध्यमातून चित्रफिती द्वारे शंका निरसन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक जयश्री जिरापुरे यांनी केले. आभार रोटरी अध्यक्ष प्रवीण बुटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शैला सावंत, आर.पी. निकम, पल्लवी गायकवाड, एम.डी. थेरोकार आणि शारदा माध्यमिक विद्यालयामधील कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी जागर स्रीत्वाचा हा सुप्रसिद्ध कलाकार आरजे बंड्या, रेडिओ सिटी 91.1 पुणे यांचा खुमासदार प्रश्नोत्तरी, मौजमजा, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन वसाहतीमधील जुने क्रीडा संकुलात करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाच्या उदघाटक तहसिलदार मिनाक्षी राठोड या राहणार असून अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता अभय हरणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्य अभियंता माधव कोठुळे आणि नितीन गगे असणार आहेत.उपस्थितीसाठी जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार यांनी आवाहन केले आहे.