कळमसरेत नैराश्यातुन तरुणाची आत्महत्या

0

कळमसरे –  येथील मनोहर उर्फ (पिंटू) राजेंद्र पाटील (वय-27) याने 25 रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास नैराश्यातुन स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या बाबत अधिक माहिती अशी की,मनोहर राजेंद्र पाटील हा शेतमजुरीचि व सालदारकिचे काम करीत असायचा कळमसरे सह अमळनेर तालुक्यात एक ते दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतमजुराना शेतीची कामे मिळत नव्हती, त्यामुळे मनोहर हा नेहमी नैराश्यात असायचा नैराश्यापोटी त्याने स्वतःच्या राहत्या घरात 25 रोजी सकाळी सुमारे 3 वाजेच्या सुमारास दोराने फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्यात आई-वडील दोन बहिणी असुन मारवड पोस्टेला अकस्मात मृत्यु र.न 28/18 सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यु दाखल असुन पुढील तपास एपीआय समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ भागवत पाटील करीत आहे.

Copy