कळमसरा येथे नालाखोलीकरणाचा शुभारंभ

0

शेंदुर्णी । पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे नुकतेच नालाखोलीकरणाचे कामाचा मान्यवरांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावाची निवड झाली असून अभियाना अंतर्गत कृषी विभागाद्वारे 29 बांधाचे गाळ काढून खोलीकरण करण्यात येणार आहे, तर 7 नविन सिमेंट बांधाची कामे करण्यात येणार आहे आणि तसेच मागेल त्याला शेततळे योजनेतुन शेततळ्याचे निर्मान करण्यात येणार आहे. प्रत्येक ओधळीवर शेततळ्याची कामे घेतल्यास प्रभावी जलसाठा निर्मान होऊन जलपातळीत वाढ होउन शेती सिंचनास लाभ होणार असुन नालाखोली करणामुळे पाणीसाठा व भुजल पातळीत कमालीची वाढ होणार असल्याने परीसरातील भुजल पातळी उंचावणार आहे. शेतकर्‍यांना लाभ होईल कामाचा शुभारंभ सरपंच विनोद निकम उपसरपंच कैलास चौधरी, पाणलोट समिती अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, सदस्य धनराज पाटील , संजय उशीर, रमेश शिंपी, हरी कुंभार, दत्तात्रय चौधरी, ईश्वर चौधरी, संजु पोस्ते, नारायण बावीस्कर कृषी सहाय्यक सुभाष अहिरे, रंगनाथ हटकर, संभाजी हटकर, निवृती उशीर यांच्या हस्ते करण्यात येऊन कामास सुरवात करण्यात आली.