कलाली डोहातील पाणीपुरवठा योजना कार्यन्वित

0

अमळनेर । आमदार शिरिष चौधरी यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेली कलाली डोहातील 8 कोटीची पाणीपुरवठा योजना शुक्रवारी कार्यन्वित झाली आहे. या योजनेचे पाणी गांधली फिल्टर प्लान्ट पर्यन्त पोचले आहे. या योजनेमुळे दर उन्हाळ्यात भेडसावणारा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटल्याने अमळनेरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

या वेळी ही योजना पूर्णत्वास आल्याने योजनेचे उपयोगीते संदर्भात आमदार शिरिष चौधरी पाणी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबईचे कक्ष अधिकारी राजेंद्र कुमठगी, म.जि.प्र.चे मुख्य अभियंता ग.ज. भिये, कार्यकारी अभियंता निकम, उपअभियंता सी.एस.पाटील, न.पा.चे मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे,पाणीपुरवठा अभियंता श्याम करंजे, आ.शिरिष चौधरी मित्र परिवाराचे गटनेते प्रवीण पाठक, उदय पाटील, श्रीराम चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, नगरसेवक प्रा.अशोक पवार, नरेंद्र चौधरी, सलीम टोपी यांच्यासोबत धनंजय महाजन, भाऊसाहेब महाजन, पंकज चौधरी, संतोष लोहरे, किरण भागुल, योगराज संदनशिव, न.पा. पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.