कर्वे स्मारकाचे काम सत्ताधार्‍यांमुळे रखडले

0

पुणे : भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कोथरूड येथील स्मारकाचे काम मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. स्मारकाचे काम प्रशासनाच्या व सत्ताधार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे रखडले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे स्मारक कामाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ त्यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. ज्या थोर पुरुषाने महिलांसाठी शाळा उभारल्या, महिलांच्या प्रश्‍नासाठी खस्ता खाल्ल्या त्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची सत्ताधारी भाजपने उपेक्षा चालवली आहे. 52 लाख रुपयांमध्ये या स्मारकाचे काम होणे अपेक्षित होते. परंतु, सत्ताधार्‍यांची उदासीनता आणि आपापसातील वाद यामुळे या स्मारकाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या थोर पुरुषाच्या बाबतीत भाजप दाखवत असलेली उदासीनता ही दुर्देवाची बाब आहे. जर भाजपला हे काम जमत नसेल तर त्यांनी तसे सांगावे. हे स्मारक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वतःच्या पैशातून, स्वतः अवजारे घेऊन मोठ्या दिमाखाने उभे करतील, असे राष्ट्रवादी नेते यावेळी म्हणाले.

Copy