कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आघाडीवर !

0

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा मतदानाची मतमोजणी आज सोमवारी होत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपला आघाडी मिळाली आहे. 15 पैकी 10 जागांवर भाजप आघाडीवर असून २ जागांवर कॉंग्रेस तर १ जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. गुरुवारी 15 जागांसाठी मतदान झाले होते. 15 जागांसाठी 165 जण आपले नशीब आजमावत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या 15 पैकी 6 मतदारसंघात भाजपला विजय मिळवणे गरजेचे आहे. सध्या 10 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तसे न झाल्यास कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार कोसळू शकतं. इथे पुन्हा काँग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात. (Karnataka bypoll results)

गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर, यल्लापूर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

Copy