कर्नाटकात बस नदीत कोसळली; २५ जणांचा मृत्यू

0

बेंगळुरू: कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील कावेरी नदीला जोडलेल्या कालव्यात एक भरधाव खासगी बस कोसळली. या झालेल्या भीषण अपघातात २५  हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश असून स्थानिक प्रशासनानं बचावकार्य हाती घेतलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, मांड्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या कावेरी नदीला जोडणाऱ्या कालव्यात आज एक खासगी बस कोसळली. पांडवपुरा तालुक्याजवळ झालेल्या या भीषण अपघातात २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतं. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी बचावकार्य हाती घेतलं आहे. भरधाव बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Copy