कर्नाटकात कम्बाला ‘पास’

0

नवी दिल्ली । तामीळनाडूतील जलीकट्टूप्रमाणेच कर्नाटकात परंपरेने सुरू असणार्‍या रेड्यांच्या शर्यतीला अर्थातच कम्बालाला आता कर्नाटक राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, आज हे विधेयक बहुमताने राज्य सरकारच्या वतीने संमत करण्यात आले आहे.

कम्बाला नावाने प्रसिद्ध असणार्‍या या शर्यतींकरिता उडपी या दक्षिण कर्नाटकी भागात विशेष मागणी होती. कर्नाटकात बैलगाडी आणि कम्बाला या दोन्ही शर्यतींदरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होते. तामीळनाडूप्रमाणे ही परंपराही बंद होईल की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच, कर्नाटक सरकारने हे बिल पास केल्याने आता जलीकट्टूचा मार्गही अधिकृतपणे मोकळा होईल आणि बैलगाड्यांच्या शर्यतींचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.
जानेवारीच्या संक्रांतीला तामीळनाडूत जलीकट्टूच्या शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून संपूर्ण राज्य रस्त्यावर आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच होते आहे.