कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्यासाठी पाककडून सकारात्मक प्रतिसाद

0

नवी दिल्ली-गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारकडून पाकिस्तानकडे कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान त्यावर पाकिस्तानने आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याचा अर्थ भविष्यात भारत-पाकिस्तान चर्चा पुन्हा सुरु होईल असा होत नाही, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे.

पंजाबमधील कर्तारपूर कॉरिडॉर सुरु करण्याबाबत भारताच्या अनेक वर्षांच्या मागणीला पाकिस्तानने दिले असले तरी दुसरीकडे सीमेवर अद्यापही पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे दहशतवाद आणि चर्चा दोन्ही एकाच वेळी होऊ शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चा सुरु होण्याची चिन्हे नाहीत.