कर्णधारपदावरुन धोनीला हटवण्याचा निर्णय थर्ड क्लास!

0

हैदराबाद: इंडियन प्रिमियर लीगमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनीला हटवण्याचा निर्णय हा थर्ड क्लास होता अशा शब्दात माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाराजी व्यक्त केली आहे. त्याला कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय माझ्यासाठी संतापजनक होता, धोनी हा भारतीय क्रिकेटमधील एक रत्न आहे असेही त्याने म्हटले आहे. या निर्णयावर संताप व्यक्त करताना अजहरने हा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगितले आहे.

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सांगितले की गेल्या आठ ते नऊ वर्षात धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने विजेतेपद पटकावले आहे. संघमालक त्यांच्या पैशाने संघ चालवतात हे मान्य आहे. पण त्यांनी धोनीचे स्थान आणि त्याची विश्वासार्हता याचा विचार करणे अपेक्षित होते. हे सर्व मला चिड आणणारे आणि दुर्दैवी वाटत असल्याचे अझरुद्दीनने सांगितले. धोनीने कर्णधारपदाचा त्याग केलेला नाही. आम्ही आगामी मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथची कर्णधारपदी निवड केली आहे. मागील हंगाम आमच्यासाठी समाधानकारक नव्हता. त्यामुळे दहाव्या हंगामासाठी एखाद्या युवा खेळाडूला कर्णधारपदी नेमण्याचा निर्णय घेतला असे पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी सांगितले होते.