कर्ज वाटपाचे आदेश पारित करावे

0

बोदवड । बोदवड परिसर सिंचन योजनेच्या तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे लाभ क्षेत्राखालील शेतजमिनदार, शेतकर्‍यांना शेतीसाठी विविध प्रकारचे कर्ज राष्ट्रीय बँकेकडून उपलब्ध करुन देण्याचा आदेश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी राष्ट्रीय बँकांना पारित करावा, अशी मागणी तालुक्यातील साळशिंगी येथील शेतकरी संतोष काळबैले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. बोदवड परिसर सिंचन योजना तालुक्यासह जामनेर, मोताळा, मलकापूर या तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी संजिवनी
ठरणारे आहे.

सिंचन योजना पूर्ण करावी
या योजनेला मंजुरी घेवून पाच वर्षे झाली परंतु काम अद्यापही पूर्ण झाले नाही. केंद्र सरकारने ही योजना विशेष प्रकल्प म्हणून जाहिर करावी तसेच 90 टक्के निधी केंद्राने व 10 टक्के निधी राज्य सरकारने दिल्यास योजना तत्काळ पूर्ण होईल. परंतु तसे झाले नाही. या प्रकल्पांतर्गत लाभ क्षेत्राखालील शेतजमिन कोरडवाहू आहे. सहकारी बँका डबघाईस आल्या आहे व राष्ट्रीय बँका शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करीत नाही. त्यामुळे अधिग्रहित जमिनीवर कर्ज वाटपाचे आदेश पारित करावे, असे शेतकरी काळबैले यांनी निवेदनात नमूद केले आहे.