कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार-मुख्यमंत्री

0

जळगाव : कर्जावरील व्याजाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. तरीही ज्या बँका लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना दिले. ते आज जळगावात आहे.

या वेळी त्यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या ४८ योजना मार्च अखेर पूर्ण करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावे समाविष्ट असल्यास त्या योजना सौर ऊर्जेवर करण्यास प्राधान्य द्या असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

धरणगाव पाणीपुरवठा व भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजित कालावधी ठरवा, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर व एरंडोलच्या योजना सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करा, असेही निर्देश त्यांनी दिले.