Private Advt

कर्ज डोईजड झाल्याने तोंडापूरच्या शेतकर्‍याची आत्महत्या

जामनेर : तालुक्यातील तोंडापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर पांडुरंग पाटील (47) यांनी शुक्रवार, 3 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास भारूडखेडा रस्त्यावरील स्वत:च्या शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज असून अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांनी हे पाउल उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, संतोष गायके शेतात मजूर सोडण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला.

अवकाळी पावसामुळे उत्पन्न घटले
घटनेची माहिती कळताच डिंगबर पाटील, नाना पाटील व गावकर्‍यांनी घटनास्थळी गर्दी केली. शेतकर्‍याच्या पश्चात दोन मुले व पत्नी असा परीवार आहे. हवालदार अनिल सुरवाडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. ज्ञानेश्वर पाटील हे तोंडापूर परीसरात कडक नाना नावाने परीचीत होते.