कर्जाच्या नैराश्याने एका तरुणाची गळफास

0
नंदुरबार। बापावर असलेल्या कर्जाच्या नैराश्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील आसने गावात घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसने येथील रामसिंग गिरासे या शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज होते,तसेच नापिकीमुळे आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. या कारणामुळे त्यांचा मुलगा गौरव रामसिंग गिरासे हा नेहमी बेचेन राहत होता,. या नैराश्यातुन त्याने राहत्या घरातच लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली, याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Copy