कर्जमाफीसाठी सर्वपक्षीय आक्रमक

0

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांसह सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाचे सर्व आमदार आक्रमक झाले. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ देणार नसल्याचे सांगत मंत्री सोडून सर्वच पक्षांच्या आमदारांनी अभूतपूर्व गोंधळ केला. या गोंधळामुळे तीन वेळेस सभागृह तहकूब करूनदेखील सदस्यांचा गोंधळ कमी होत नसल्याचे सभागृह संपूर्ण दिवसासाठी तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्षांना घ्यावा लागला. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोवर सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याचा पवित्रा विरोधी पक्षांसह शिवसेनेने घेतला आहे. या मागणीसाठी दुपारी 12 पर्यंत सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज विरोधकांपेक्षा शिवसेना जास्त आक्रमक दिसून आली. सभागृहाबाहेर सेनेच्या आमदारांनी भाजपा विरोधी घोषणाबाजी देखील केली. यासोबत भाजपाचे आमदार देखील अगदी जोशात कर्जमाफीची मागणी करताना दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर विरोधी पक्षाने भाजपाचे हे मगरमच्छचे अश्रू असल्याची टीका केली आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्या, शुक्रवारी देखील काही निर्णय न घेल्यास कामकाज होण्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]

ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज 

[edsanimate_end]कामकाज होऊ देणार नाही!

विधानसभा सभागृहात आज, गुरुवारी सकाळी 11 वाजेपासूनच शेतकाऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधकांनी गोंधळ सुरु केला. यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी आपसात चर्चा करून विरोधकांसोबत आक्रमक व्हायला सुरुवात केली. शिवसेनेच्या आमदारांनी फलक लावून कर्जमाफीची मागणी केली तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर काहीवेळासाठी सभागृह तहकूब झाल्यानंतर भाजपाचे देखील सर्व आमदार कर्जमाफीसाठी आखाड्यात उतरले. यावेळी भाजपाचे आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर उभा राहून घोषणाबाजी देखील करत होते. सर्वच पक्षांच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनाला अक्षरशा घेराव घातला होता. यावेळी मंत्री मात्र दुरून गोंधळ पाहत होते. गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने अध्यक्षांना कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

सर्वपक्षीयांची जोरदार घोषणाबाजी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांसह सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या आमदारांनी देखील सभागृहात आणि सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शिवसेनेचा एकच नारा, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा अशा घोषणा शिवसेना आमदारांनी केल्या. आधी शिवसेना आमदारांनी घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडलं. शिवसेना आमदारांनी वेलमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजप आमदारांनी देखील घोषणाबाजी केली. विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदार घोषणाबाजी करतानाचे अफलातून चित्र पाहायला मिळाले.

भाजप व सेना आमदारांची भूमिका

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनात उतरलेल्या सत्ताधारी भाजप आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षातले नेते नाटक करतात. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. 100% कर्ज माफ व्हावी ही भाजपची भूमिका असल्याचे भाजप आमदार ओरडून सांगत होते. मुख्यमंत्र्यांना विनंती की खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, बोगस बँकधारकाना कर्जमाफी देऊ नये अशी भूमिका भाजप आमदारांनी मांडली. तर राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. भाजपचा विजयाचा वारु उधळला असला तरी शेतकऱ्यांच्या छातीवर पाय ठेवून सरकार चालत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत सेनेचा लढा सुरु राहिल व कामकाज चालू देणार नाही असा इशारा शिवसेनेने देखील दिला आहे. आमचे मंत्री सरकारसोबत चर्चा करत असून त्यांना यश मिळत नसल्याचे चित्र दिसल्याने आम्ही आंदोलनात उतरलो असल्याचे शिवसेनेच्या आमदारांनी सांगितले.