कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक; विधान भवनाच्या पायऱ्यावर निदर्शने !

0

मुंबई: आजपासून महाविकास आघाडी सरकारचे आज पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. बलाढ्य विरोधी पक्षासमोर सरकारची कसोटी लागणार आहे. दरम्यान अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच भाजप आक्रमक भूमिकेत दिसून येत आहे. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी भाजपच्या आमदारांनी केली.

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत, महिला सुरक्षा या 2 मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव आणणार, महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहे, त्यामुळे सरकार कधीही पडू शकते असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. दोन्ही सभागृहात स्थगन प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे.