कर्की फाट्याजवळ मोटारसायकल कंटेनर अपघातात तीन जखमी

0

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर बर्‍हाणपूर रोडवरील कर्की फाट्याजवळ मोटारसायकल व कंटेनरच्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी तालुक्यातीलच वडोदा येथील रहिवासी असुन त्यांंना पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान कर्की फाट्याजवळ गतिरोधक उभारण्यात यावे अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील वडोदा येथील रहीवाशी राजु तुकाराम खिरळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कर्कीकडुन मुक्ताईनगरकडे मोटार सायकल क्रमांक एमएच 29 टी. 8048 वर राजु खिरळकर, संंतोष समाधान मांंडोकार आणि अनिल शालिग्राम खिरळकर तिघेही येत असतांना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर क्रमांक एचआर 47 सी 2933 ने मोटारसायकलीस जोरदार धडक दिली. त्यात फिर्यादीसह तिघेही गंभीर जखमी झाल्याने, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असुन सदर फिर्यादीवरुन कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहे.