करोना : मशिदीत एकत्र जमले; ८५ जण रुग्णालयात

0

नवी दिल्ली : दिल्लीत सोमवारी सकाळपर्यंत ७२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान लोकनायक रुग्णालयात एकत्रच जवळपास ८५ जणांना भर्ती करण्यात आले. हे सर्व जण ‘जमात’साठी मशिदीत एकत्र जमले होते.
लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ८५ जणांमध्ये सौदी अरबसारख्या देशांतील नागरिकांचाही समावेश आहे. एका महिन्यापूर्वी निजामुद्दीन मशिदीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेले ६ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जवळपास २०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. आणखीन १००० जणांचा शोध सुरू आहे. ज्या २०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैंकी ९९ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळली आहेत.

Copy