करोनाविरूद्ध लष्कर मैदानात: ८ हजार वैद्यकीय कर्मचारी, ९ हजार बेड सज्ज

0

नवी दिल्ली – देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोरोनाविरुध्द लष्करदेखील मैदानात उतरले आहे. करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ९ हजारांपेक्षा अधिक बेड सज्ज ठेवण्यात आले असून ८ हजार ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार ठेवण्यात आले आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत व लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सैन्य दलाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

गेल्या पाच दिवसांमध्ये देशात निरनिराळ्या ठिकाणी तब्बल २५ टन वैद्यकीय साधन सामग्री पोहोवली असल्याची माहिती हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना दिली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हवाईदलाची आवश्यक ती कामे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Copy