करवाढ नसली तरी सोयीसुविधा द्या

0

जळगाव । सोमवारी महापालिकेत आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान महापलिकेवर असलेल्या हुडको व जेडीसीसी बँकेच्या कर्जफेडीमुळे मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा देता येत नसल्याने करावाढ करणे योग्य होणार नसल्याचे आयुक्त सोनवणे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान करावाढ नसली तरी कर आकारणीतील तफावत दूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. पाच लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या जळगाव महानगर पालिकेच्या या अंदाजपत्रकानुसार 593 कोटी 95 लक्ष रूपयांचे अंदाजपत्रक सादर कण्यात आले. अंदाजपत्रक 6 कोटी 71 लाख 44 हजार रूपये शिलकीचे अंदाजपत्रक प्रशासनाने सादर केला आहे. या अंदाज पत्रकारवर विशेष स्थायी सभेत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष महासभेत सादर करण्यात येणार आहे.

सुविधा देण्यात महानगरपालिका मागे
या अंदाजपत्रकाविषी नागरिकांमध्ये समिश्र प्रतिक्रया दिसून आली. महानगर पालिकेवरी कर्जांमुळे शहराचे विकासकामे रखडली आहेत. कर वाढ झाली नसली तरी सोयी सुविधा देण्यात महानगर पालिका मागे पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये उमटत आहे. शहरातील फुले मार्केट मधील कर वसूलीबाबत निर्णय झालेला नसल्याने महानगर पालिका विकासकामे करू शकत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न केल्याने भविष्यात कर्जाची परतफेड करणे, कर्ज परतफेड क्षमता राखणे यासाठी महापालिकेला स्वत:चे उत्पन्न वाढविण्यावाचून गत्यंतर नसल्याचे यातून दिसून येत आहे. कर्ज परतफेड क्षमतेअभावी कोणत्याही वित्तीय संस्था कर्ज देण्यास इच्छुक राहणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे.

अर्थसंकल्प सादर करून काहीच फायदा नाही. महापालिकेकडे पैसा नाही. पैसा नसल्याने शहराचा विकास होत नाही. उत्पन्नाचे श्रोत वाढणे गरजेचेच आहे. लेखा परीक्षणामध्ये जो अहवाल आला आहे. त्यानुसार नगरसेवकांकडून वसुली होणे गरजेचे आहे.महात्मा फुले मार्केट च्या गाळेधारकांना नगरसेवकांनी हस्तक्षेप करून सूट देऊन ठेवली आहे. फुले मार्केटची वसुली होत नाही.तसेच महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. वसुली वेळेवर होणे गरजेचे आहे. तेव्हाच शहराचा विकास शक्य आहे. श्रोत बंद झाल्याने विकासच होणार नाही 90 कोटी महापालिकेचा खर्च होतो. मनपाची 140 कोटी वसुली वर्षाची आहे.48 कोटी वर्षा मध्ये कर्ज फेडी मध्ये जातात. श्रोत बंद झाल्याने विकासच होणार नाही.-दीपक गुप्ता, सामाजिक कार्यकर्ता

अर्थ संकल्प विकासाच्या दृष्टीने लाभदायक पाहिजे. शहरात विकास कामे मंदावली आहे.जळगावकर फार संयमी आहेत. लोकप्रतिनिधीनी याची दाखल घायला हवी. कर वाढ झाली नाही ठीक आहे मात्र महापालिका नागरिकांना सोयीचं उपलब्ध करीत नसल्याने रोष कायम आहे. अर्थसंकल्प हा परवडणारा हवा.
-राजेश शिंदे, मेहरूण

अर्थसंकल्पात महापालिकेच्या कर्जफेडी चा विचार झाला पाहिजे. कर्जफेड झाली पाहिजे. त्या शिवाय शहराचा विकास होऊ शकत नाही. वसुली वेळेवर होणे गरजचे आहे. दिलेला टार्गेट पूर्ण होत नाही. महानगरपालिका केवळ कर आकारणी करित असते. पाईप लाईन फुटण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. -संजय बावीस्कर
अर्थसंकल्प महापालिकेतच असतो. त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. लोकांनाही अर्थसंकल्पात आपल्या शहराचा काय विकास होणार आहे याची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. सर्वसामान्या चा विचार होणे आवश्यक आहे. करवसुली करण्यासारखे महापालिकेने नागरिकांना काहीच दिले नाही.
-ईश्वर चौधरी, योगेश्वर नगर

महापालिका कर वसुली करते मात्र सुविधा देत नाही. अर्थसंकल्प सादर होत असताना नागरीकाकांच्या समस्यांचा विचार झाला पाहिजे. नागरिकनांच्याच पैशावर महापालिकेचे कर्ज जेमतेम फेडले जात आहे. सत्ता कोणाचीही असो जळगावकरांना विकासाची आस आहे. मात्र त्याच्याशी तडजोड केली जात आहे.
-सुनील पवार, सेंट्रल बँक कॉलनी