करमाड विद्यालयात शिवजयंती साजरी

0

पारोळा । येथील कै.तात्यासाहेब रु.फ.पाटील शिक्षण मंडळ देवगाव संचलित माध्यमिक विद्यालय व किमान कौशल्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करमाड (ता.पारोळा) येथे विद्यालयाच्या प्रांगणात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे शिक्षक एस.पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.जगदीश भागवत, आर.एच.पाटील, बी.बी.पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिवगीतावर नृत्य सादर केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते.