कन्हाळे सरपंच, उपसरपंचांचे अपिल फेटाळले

0

भुसावळ : तालुक्यातील कन्हाळे बु. येथील सरपंच व उपसरपंच यांनी गावातील सरकारी जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या विवाद अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला होता. यानुसार अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी दोघांना अपात्र घोषीत केल्यानंतर त्यांनी नाशिक विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपिल दाखल केले होते. मात्र आयुक्तांनी हा अपिल फेटाळून लावत अप्पर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मात्र गावातील राजकीय वातावरण तापले असून या निर्णयानुसार नव्याने सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक करावी लागणार आहे.

निवडणूकीची उत्सुकता
येथील सरपंच मंगला राजेंद्र पाटील व उपसरपंच ईश्‍वर हरिसिंग भिल यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी येथील रहिवासी रुपसिंग चौधरी यांनी अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्याचा निकाल अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये देऊन सरपंच व उपसरपंच यांना अपात्र ठरविले होते. त्यावर सरपंच मंगला पाटील व उपसरपंच भिल यांनी अप्पर आयुक्तांकडे अपिल दाखल केले होते. या अर्पिल अर्जास अप्पर आयुक्तांनी 15 डिसेंबर रोजी फेटाळले तरी आता ग्रामस्थांना सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणूकीची उत्सुकता लागून आहे.