कन्हाळे खुर्दमध्ये जुगाराचा डाव उधळला : सहा आरोपी जाळ्यात

0

भुसावळ : तालुक्यातील कन्हाळा खुर्द गावात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी धाड टाकत सहा आरोपींना अटक केली. रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. जुगार खेळणार्‍या चेतन श्रीराम भील, अनिल बाबुराव सुरवाडे, अन्सार रशीद गवळी, महम्मद पीरू गवळी, इकबाल हुसेन गवळी, पांडुरंग उर्फ पांडा वसंत सुरडकर यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून पाच हजार 200 रुपयांच्या रोकडसह दोन दुचाकी मिळून 41 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, भीमदास हिरे, विठ्ठल फुसे, प्रवीण पाटील, रीयाज काझी, होमगार्ड रीतेश सेकोकारे यांनी केली.

Copy