Private Advt

कन्हाळा येथे गावठी दारू भट्टीवर पोलिसांची धाड

भुसावळ : तालुक्यातील कन्हाळा बुद्रुक येथे गावठी दारूचा भट्टीवर तालुका पोलिसांनी धाड टाकत 38 हजार रुपयांची दारू नष्ट केली. कन्हाळा येथील गवळीवाड्याजवळ छट्टू गवळी हा घराच्या भिंतीच्या आडोशाला गावठी दारूचा अड्डा चालवत असल्याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी कारवाई करीत सहा पत्री ड्रममधील गावठी दारूसह सुमारे 200 लिटर गुळ, मोह, नवसागर मिश्रित एकूण 1200 लिटर कच्चे रसायन नष्ट केले तसेच 30 लिटर गावठी हातभट्टी तयार दारू मिळून एकूण 38 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी छट्टू गवळी हा पोलिसांना पाहताच पसार झाला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी खंडारे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.