कन्नड घाटात ट्रक दरीत कोसळून चालक जागीच ठार!

चाळीसगाव: कन्नड घाटाच्या वळणावर भरधाव ट्रकचा वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने ट्रक खोल दरीत कोसळून चालक जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड घाटात ट्रक (क्र. टी.एस-१२ यूसी-८१७०) भरधाव वेगाने जात असताना. वळणावर वेगावर नियंत्रण न मिळवता आल्याने ट्रक खोल दरीत कोसळली. यात चालक शिवराज मलप्पा (वय-३२ रा. जि. बिदर राज्य कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर सचिन भिमशा हिरबावी यांना दुखापत झाली आहे. हि घटना दि. १६ रोजी सकाळी ४:३० ते ५ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात क्लिनर सचिन भिमशा हिरबावी यांनी भादवी कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, १८४ अशा विविध कलमान्वये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास हेकॉ/२४२० दिलीप रोकडे हे करीत आहेत.