Private Advt

कन्नड घाटात अवजड ट्रक कोसळला : चालकाचा मृत्यू

भुसावळ/चाळीसगाव : कन्नड घाटात अवजड ट्रक कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडला. सलीम मुसा शेख (23) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. या अपघातात बंडू भानुदास गायकवाड (32, उस्मानाबाद) असे जखमीचे नाव आहे.

नियंत्रण सुटल्याने ट्रकदरीत कोसळला
चाळीसगावहून औरंगाबादकडे जात असलेला ट्रक (क्र.के.ए.22 बी.7047) अचानक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळला. हा अपघात रविवारी रात्री 12.30 वाजेनंतर घडला. या अपघातात चालक सलीम मुसा शेख (23) यांचा मृत्यू झाला तर बंडू भानुदास गायकवाड (32) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात घटना कन्नड घाटातील सरदार पॉईंट ते म्हसोबा मंदिरादरम्यान घडला. अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, या अपघातामुळे घाटात वाहतूकीची कोंडी झाली होती मात्र महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.