कथा आवडूनही राकेश शर्मा बायोपिकला आमिरने का दिला नकार ?

0

मुंबई : ‘सारे जहाँ से अच्छा’ हा चित्रपट अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र शाहरुखच्याही आधी ही भूमिका आमिर खानला विचारण्यात आली होती. आमिरनंही या बायोपिकसाठी होकार दिला मात्र ऐनवेळी आमिरने पाठ फिरवली. आमिरनं ही संधी का सोडली असा प्रश्न सगळ्यांनाच होता, याच उत्तर आमिरनं नुकतच एका मुलाखतीत सांगितले.

‘महाभारत’वर आधारित चित्रपट काढायचा हे आमिरचं स्वप्न आहे. या महत्त्वाकांक्षी प्रोजक्टमध्ये व्यस्त असल्यानं आमिरनं राकेश शर्मा यांच्या बायोपिकला नकार दिला असे स्पष्टीकरण दिले आहे. अंजूम राजाबाली यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ची कथा लिहिली जी आमिरला खूपच आवडली, मात्र त्यानं ऐनवेळी चित्रपट करण्यास नकार दिला. पण, आमिरनं शाहरूखचं नाव दिग्दर्शकांना सुचवलं. शाहरुखनंही कथा वाचून आणि आमिरच्या सल्ल्यावरून चित्रपटाला होकार दिला.

Copy