कडूसकर, नाहाटा, चौधरी यांना जीवन गौरव पुरस्कार

0

जळगाव । त्रिमुर्ती तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आज त्रिमुर्ती संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला त्रिमुर्ती सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या सन्मान सोळळ्यात डॉ.उल्हास कडुस्कर, डॉ सुनील नाहाटा, डॉ. उत्तम चौधरी यांना मान्यवरांच्याहस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्रिमुर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सिंधुताई सपकाळ, तर राज्यसहकार मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.

माफ करायला शिका
अध्यक्षीय भाषणात सिंधुताई सपकाळ यांनी मनोज पाटील यांचा कार्याचा गौरव केला तसेच मनोज पाटील यांना उद्देशून म्हटले की असा सन्मान सोहळा हा संपूर्ण रयत आजपर्यंत मि पहिला नाही, तु चांगले काम करतो असेच काम करत राहा आणि मुलींना बायानो माफ करायला शिका , तुम्ही माफ करता म्हणून तुम्हाला माउली म्हणतात असे सांगितले.

सोहळ्यात यांचा झाला सन्मान
सोहळ्याचे उद्घाटन सिंधूताई सपकाळ यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक पी.पी.माहुलीकर, विष्णू भंगाळे, डॉ राधेश्याम चौधरी, संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर डॉ उल्हास कडुस्कर, डॉ. सुनील नाहाटा, डॉ उत्तम चौधरी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 10 डॉक्टर, 10 आदर्श शिक्षक आणि प्रगतशील शेतकरी रामचंद्र पाटील, अशोक पाटील तसेच प्राध्यापक एस आर पाटील, मुकुंद गोसावी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगतात अध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले की, त्रिमूर्ती सन्मान सोहळा गेल्या 3 वर्षापासून करण्यात येत आहे दर वर्षी सन्मान सोहळ्याचे स्वरूप हे मोठे होत आहे दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी 10 सेवाभावी डॉक्टर ,10 आदर्श शिक्षक, 10 कृषिभूषण ,आणि 4 माजी सैनिकांचा सत्कार करीत असल्याचे सांगितले.