कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

0

नवी दिल्ली- कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाने आज दिलासा देण्यास नकार दिला. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करावी, अशी आरोपींची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. विद्यमान तपास यंत्रणेच्या तपासात हस्तक्षेप कऱण्याची गरज नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने या घटनेचा तपास जम्मू- काश्मीर पोलिसांकडेच कायम ठेवला आहे.

Copy