कच्छ कडबा पाटीदार युवक मंडळातर्फे रक्तदान शिबीर

0

चाळीसगाव। स्व. केशरा परमेश्वरा संखान यांच्या 249 व्या व नारायण रामजी लिंबानी यांच्या 134 व्या जयंती निमित्त येथील चाळीसगाव कच्छ कडबा पाटीदार युवक मंडळाच्या वतीने भडगाव रोड स्थित समाज मंगल कार्यालयात (पाटीदार भवन) नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा आशालता चव्हाण व विश्वास चव्हाण उपस्थित होते.त्यांनी आपल्या मनोगतातून पाटीदार समाज हा कशा प्रकारे इतर समाजात मिसळून राहून आपला व्यवसाय करत शहरात सलोख्याचे संबंध राखून आहे. तसेच रक्तदान करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी कच्छ कडबा पाटीदार समाजचे सचिव नानजी भाई पटेल यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सामूहिक लग्न हि आत्ताच्या काळाची गरज असून आमच्या समाजात देखील असे लग्न समारंभ आयोजित केले जातात याबद्द्ल माहिती दिली.

शिबिरात 60 बाटल्या रक्त संकलन
या शिबिरात एकूण 60 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. सूत्रसंचालन जयंतीभाई पटेल यांनी केले तर आभार प्रवीण भाई पटेल यांनी मानले रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी अर्जुन भाई पटेल, नानजीभाई पटेल, केशु भाई पटेल, मगनभाई पटेल, मणिभाई पटेल, शांतीभाई पटेल, मोहनभाई पटेल, हिमनभाई पटेल, जितेंद्र भाई खटोड, प्रवीणभाई पटेल, तुलसी भाई पटेल, जयेश पटेल, विनोद पटेल, कौशल पटेल, भरत पटेल, रोहित पटेल, विजय पटेल, कुणाल पटेल, राजेश पटेल सोमचंद्र भाई पटेल यांचे सह पाटीदार समाज महिला मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.