कचर्‍याच्या समस्येवरुन प्रभाग 7 मधील नागरिकांचा रोष

0

उपमहापौर आपल्या दारी अभियानः नागरिकांनी सुनील खडके यांच्याकडे मांडल्या समस्या

जळगाव: शहरातील ख्वॉजा मिया परिरासह प्रभाग क्रमांक 7 मध्ये उपमहापौर आपल्या दारी या अभियानांतर्गत उपमहापौर सुनिल खडके यांनी बुधवारी पाहणी दौरा केला. यावेळी नागरिकांनी कचर्‍यासह विविध समस्यां उपमहापौरांकडे मांडल्या. तसेच कुणीतरी समस्या जाणून घेण्यासाठी आले असे म्हणत उपमहापौरांसह उपस्थित पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांचे आभारही यावेळी मानले.

यांची होती उपस्थिती
यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, पिटू काळे, अतुलसिंग हाडा, भरत सपकाळे , शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रभाग अधिकारी संजय पाटील, विद्युत विभाग प्रमुख एस एस पाटील, अभियंता योगेश बोरोले, संजय नेवे, अविनाश कोल्हे, मंजुर खान, मोरे, रचना सहाय्यक प्रसाद पुराणिक, सुहास चौधरी, आर.टी.पाटील, आरोग्य अधिक्षक धांडे, निरिक्षक कांबळे, सुरेश भालेराव आदी अधिकारी उपस्थित होते.

ठेकेदाराला उपमहापौरांची तंबी
शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये संगम सोसायटी, ब्रुक बॉण्ड कॉलनी, शिक्षकवाडी हा परिसर येतो. या परिसरातील नागरिकांनी उपमहापौर सुनील खडके यांच्या कडे आपआपल्या समस्या मांडत स्वच्छता होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सांगितले तसेच घंटागाडी नियमित कचरा उचलण्यास येत नसल्याची नाराजीही यावेळी व्यक्त केली. यावेळी उपमहापौर खडके यांनी मुकादमला सूचना करत दररोज प्रभागा मध्ये स्वच्छता व्हायला हवी अशी तंबी दिली. तसेच प्रभागातील समस्येचे निराकरण होण्यासाठी संपर्क क्रमांकाचे फोटो लावावेत असे आवाहनही यावेळी उपमहापौर सुनील खडके यांच्या तर्फे करण्यात आले. उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमाचे नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुणी तरी अमच्या दारी तरी आले असे म्हणत उपमहापौरांचे आभार मानले.

Copy