कचरा संकलनाची निविदा मंजूर

0
आठ वर्षासाठी 348 कोटी खर्च
पिंपरी-चिंचवड : शहरातील 8 प्रभाग क्षेत्रातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम ए.जी. इनव्हायरो इंफ्रा आणि बीव्हीजी या दोन संस्थांना देण्यात आले आहे. आठ वर्षांच्या कालावधीसाठी हे काम दिले गेले असून 348 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर, ठेकेदारांशी वाटाघाटी केल्याने करदात्यांचे आठ वर्षात तब्बल 84 कोटी 91 लाख रुपयांची बचत होणार आहे. या निविदांना मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
संकलन आणि डेपोपर्यंत पोहोच
महापालिकेने शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. शहराच्या आठ प्रभाग क्षेत्रातील कचरा गोळा करणे, त्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पालिकेने ए. जी. इनव्हायरो इंन्प्रा प्रोजेक्टस आणि बीव्हीजी इंडीया या कंपनीला दिले होते. यासाठी वार्षिक 56 कोटींचा खर्च येणार होता. तसेच हे काम आठ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले होते.  पुणे – मुंबई महामार्गाचा मध्यबिंदू मानून पिंपरी – चिंचवड शहर दोन भागात विभागण्यात आले होते. पुणे – मुंबई महामार्गाचे दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभाजन करण्यात आले होते.
Copy