कचरा वेचकांना देणगी नाही तर संधी द्या…

0

जळगाव । कचरा वेचक मुलांच्या प्रश्नाकडे सहानभूतीने बघण्याची गरज असून, या मुलांना कोणत्याही देणगी पेक्षाही प्रेम आणि संधी देणे जास्त महत्वाचे आहे असे प्रतिपादन अव्दैत दंडवते यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. अव्दैत हे त्यांच्या वर्धिष्णू संस्थेमार्फत जळगावातील तांबापूरा भागात राहणार्या कचरा वेचक मुला-मुलींसाठी आनंदघर नावाने केंद्र चालवतात.

कामाचा आढावा दिला

या संस्थेने गेल्या तीन वर्षात जळगावातील हून अधिक शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहास दाखल केलेलं आहे. कार्यक्रमात अव्दैत यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास तसेच ते करत असलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. कचरा वेचक मुला-मुलीमध्ये शाळाबाह्य असण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. तसेच त्यांचे आरोग्याचे प्रश्न देखील गंभीर असल्याची माहिती त्यांनी दिली. वर्धिष्णू या संस्थेमार्फत कचरा वेचक मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि व्यसनमुक्ती यावर प्रामुख्याने काम केले जात आहे. प्रास्ताविक रोटरी वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे यांनी तर परिचय डॉ.आनंद दशपुत्रे यांनी करून दिला.