कंबरेला पिस्टल लावून रुग्णालयात वावर : भुसावळातील तिघा आरोपींना अटक

भुसावळ : गावठी कट्टा बाळगणार्‍या तिघा आरोपींच्या बाजारपेठ व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाईत 29 रोजी अटक केली असून आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा कट्टा जप्त करण्यात आला. अफाक अख्तर पटेल (25, पटेल कॉलनी, झोपे डॉक्टरांच्या गल्लीत, खडका रोड, भुसावळ), अदनान शेख युनूस (25, आगाखान वाडा, मटण मार्केट, भुसावळ) व वकील खान उर्फ गोल्डी शकील खान (30, न्यू ईदगाह, होलिया मशीदजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
भुसावळातील मच्छीवाडा भागात दोन गटात छेडखानी कारणावरून दोन गट भिडल्यानंतर जखमींना गोदावरीत हलवण्यात आले व जखमींना भेटण्यासाठी अफाक पटेल व अदनान शेख येथे तेथे गेल्यानंतर गोपनीय बातमीदाराला संशयीतांच्या कमरेला कट्टा असल्याची माहिती मिळाली शिवाय संशयीत रुग्णालयाबाहेर पडताना त्याचवेळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे तेथे पोहोचल्यानंतर संशयीत थबकले व त्यांनी तेथून काढता पाय घेतला. वाघचौरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब हेरली व संशयीतांनीदेखील पोलिस आपल्याला केव्हाही अटक करतील म्हणून त्यांनी आपल्याकडील कट्टा वकील खान उर्फ गोल्डी शकील खानकडे दिला. दोघा संशयीतांना आधी ताब्यात घेवून बोलते करताच त्यांनी गोल्डीकडे कट्टा दिल्याची कबुली देताच आरोपीच्या पंधरा बंगला परीसरातील जलाल शहा दर्गा परीसरातून शनिवार, 29 रोजी सायंकाळी पावणेसात वाजता मुसक्या आवळण्यात आल्या व 15 हजार रुपये किंमतीचा कट्टा जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून तिघा आरोपींविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
तिघा आरोपींच्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, जळगाव स्थानिक गुन्हे शाखा जळगाव निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे नाईक रवींद्र बिर्‍हाडे, नाईक उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव, दिनेश कापडणे, सुभाष साबळे, परेश बिर्‍हाडे, प्रशांत परदेशी, जीवन कापडे व जळगाव गुन्हे शोध पथकातील शरीफ काझी, युनूस शेख रसुल, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव आदींच्या पथकाने आवळल्या. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कृष्णा भगवान भोये करीत आहे.