कंडारी येथून चोरट्यांनी दुचाकी लांबवली

The thieves stole the bike from Kandari भुसावळ : शहर व तालुक्यात दुचाकी चोरीचे सत्र कायम आहे. कंडारी येथून घराबाहेर लावलेली 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार, उत्तम युवराज सोनवणे (24, कंडारी, ता.भुसावळ) यांनी त्यांची दुचाकी (एम.एच.19 डी.पी.3242) ही घराबाहेर लावली असताना 15 ते 16 ऑगस्टदरम्यान चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय मोहम्मद वली सैय्यद करीत आहेत.