कंडारी येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील विनोद भैय्यासाहेब सुर्वे वय 35 या तरुणाने राहत्या घरात वायरच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

कंडारी येथे विनोद सुर्वे हा तरुण एकटाच राहतो. या परिसरात त्याच चुलतभाऊ निलेश सुर्वे हा देखील राहतो विनोदचे आई वडीलांचे काही वर्षापुर्वी निधन झाले आहे. मिळेल ते काम करुन तो उदरनिर्वाह भागवित होता. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता शेकोटीवर अंग शेकण्यासाठी आला. यानंतर पुन्हा घरात जावून झोपतो म्हणून घरी गेला. अर्धातासानंतर निलेश हा विनोद खरोखर झोपला आहे का हे पाहण्यासाठी गेला , असता खिडकीतून डोकावले असता, विनोदने घराच्या छताला वायरने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्याने हा प्रकार गावातील पोलीस पाटील कैलास पाटील यांना कळविला. कैलास पाटील याबाबत नशिराबाद पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रविण ढाके यांनी घटनास्थळ गाठले. व घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी पोलीस पाटील कैलास पाटील यांच्या खबरीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहेत.