Private Advt

कंडारी युनियन बँकेला जिल्हा ग्राहक आयोगाचा दणका

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील वयोवृद्ध पेन्शन धारकाला वाढीव लाभ न देणार्‍या कंडारी युनियन बँकेला जिल्हा ग्राहक आयोगाने चांगलाच दणका दिला असून मानसिक त्रासापोटी व अर्जाचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा ग्राहक आयोगाचा दणका
कंडारी येथील केसरबाई रामचंद्र जेठवे यांचे कंडारीतील युनियन बँक ऑफ इंडियात पेन्शन खाते असून रेल्वेकडून त्यांना पेन्शन प्राप्त होते. रेल्वे नियमान्वये वृयात वृद्धी झाल्यावर पेन्शन वाढीची 30 टक्के वाढीव रक्कम मिळणे गरजेचे होते. तक्रारदार महिला रेल्वे विभागाकडील मेडिकल सेवा घेत नसल्याने मेडिकल भत्ता एक हजार रुपये मिळणे गरजेचे होते. बँकेकडून त्रृटीयुक्त सेवा मिळत असल्याने जिल्हा आयोग आयोगाकडे तक्रार दाखल करून दाद मागण्यात आली होती. 10 जानेवारी रोजी आयोगाने तक्रार अंशतः मान्य केली तसेच तक्रारदारांना त्यांच्या पेन्शन खात्यावरील देय असलेला वाढीव लाभ तक्रारदाराच्या पेन्शन खात्यात व्याजासह वर्ग करावेत तसेच तक्रारदाराला शारीरीक व मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च पाच अदा करण्याचे आदेश देण्यात आले. तक्रारदारातर्फे अ‍ॅड.राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.लतीब एच.पिंजारी यांचे सहकार्य लाभले.