कंडारीत किरकोळ कारणावरून एकास मारहाण

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे किरकोळ कारणावरून एकास फायटरने मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवार, 23 रोजी घडली. या प्रकरणी शहर पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बारसू सीताराम मोरे (58, रा.कंडारी) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी नऊ वाजता डॉ.अविनाश सोनवणे यांच्या दवाखान्यासमोरून संशयीत मनोज श्रावण मोरे (कोळीवाडा, कंडारी) हा दुचाकीवरून आपला पुतण्या मनोज यास पाणी घेण्यासाठी घेवून जात असल्याने त्यास हटकले असता त्याने आपल्याकडील फायटरने आपल्या डोक्यावर तसेच कपाळावर मारहाण करीत शिविगाळ केली. जखमी झालेल्या बारसू मोरे यांच्यावर ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. मोरे यांच्या तक्रारीवरून संशयीत मनोज श्रावण मोरे (कोळीवाडा, कंडारी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शशीकांत पाटील करीत आहेत.

Copy