कंडारीतील दुचाकीस्वार खड्डा चुकवताना जखमी

Kandari biker injured while avoiding pothole यावल : यावल-भुसावळ रस्त्यावर खड्डा चुकवतांना दुचाकीचा अपघात होवून 40 वर्षीय दुचाकीस्वार जखमी झाला. यावल-भुसावळ रस्त्यावर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.एच.0740) द्वारे प्रमोद ओंकार जावरे (रा.कंडारी) हे भुसावळकडून यावलकडे येत असताना यावल जवळील पाटचारीच्या पुढे रस्त्यावरील खड्डे चुकवत असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात घडला. यात त्यांच्या पाठीला व चेहर्‍याला दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले येथे डॉ.सचिन देशमुख, अधिपरीचारीका नेपाली भोळे, विजय शिंदे यांनी त्यांच्यावर उपचार केले.