Private Advt

कंडारीच्या इसमाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू

भुसावळ : तापी नदीच्या पाण्यात बुडाल्याने कंडारीतील 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुनील उर्फ सावळ्या चंदर पवार (45, कंडारी) असे मयताचे नाव आहे.

डोहात पडल्याने मृत्यू
कंडारी येथील चंदन पवार हे बुधवारी तापी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते मात्र यावेळी डोहात बुडून त्यांचा मृत्यू ओढवला. नदीच्या काठावर असलेल्या लोकांनी आरडा-ओरड केली तसेच पोहणार्‍यांनी नदीत उड्या मारून सुनील यांना पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू ओढवला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, सहायक फौजदार मोहंमद अली सय्यद, समाधान पाटील, मोहन पाटील, संजय सोनवणे, जाकीर सय्यद आदींनी धाव घेत पंचनामा केला. पोलिस पाटील रामा तायडे यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार मोहंमद वली सय्यद करीत आहेत.