कंटेनरच्या अपघातात भानखेड्यातील दोन मुलींचा मृत्यू

0

बोदवड – शेलवडकडे जाणाऱ्या मोटारसायकलला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कन्टेनरने जोरदार धडक दिल्याने दोन मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली असून कन्टेनर वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, भानखेडा येथे राहणाऱ्या अनंन्या दशरथ निकम, अवनी दशरथ निकम या दोन भाच्या आई मनिषा निकम यांच्यासह पितृपक्षाच्या निमित्ताने सकाळी शेलवड येथे मामा पवन सुकाळे यांच्याकडे आल्या होत्या. कार्यक्रम आटोपून सायंकाळी 5 वाजता मामा पवन सुकाळे यांच्या दुचाकीने बोदवड येथे सोडण्यासाठी येत असतांना दुचाकी क्र.(एमएच 19, एडी 8404) ला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर (आरजे 14, जीके 3121) ने जोरदार धडक दिल्याने अनंन्या दशरथ निकम (वय-५), अवनी दशरथ निकम (वय-३) रा. भानखेडा याचा जागीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कन्टेनर चालक फरार झाला आहे. मामा पवन सुकाने यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीसात कन्टेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy