कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणाहून घरपोच मद्य विक्रीला परवानगी

1

जळगाव:शहर महापालिका क्षेत्र, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, अडावद, चोपडा आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणच्या मद्यविक्री दुकानांमधून घरपोच मद्य विक्री करण्याला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी दिली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही मद्य विक्री करता येणार आहे. दरम्यान ग्राहकांना घरपोच मद्य उपलब्ध करून देताना डिलीवरी बॉयसाठी आवश्यक त्या सूचना व अटी घालून देण्यात आल्या आहेत.

Copy