औरंगाबाद उड्डाणपुलाजवळ ट्रकने दुचाकीला उडवले

0

औरंगाबाद । सिग्नल बंद होण्यापूर्वीच पुढे वेगात निघालेल्या ट्रकचालकाने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार 3 वर्षीय चिमुकीला ट्रकने चिरडल्याने ती जागीच ठार झाली. तिचे वडिलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर आईला किरकोळ मार लागला. हा अपघात रविवारी (दि.2)सकाळी 11 वाजता बीड बायपासरोडवरील संग्रामनगर टी पॉईंट वाहतुक सिग्नलवर घडला. अनुष्का अनील पवार(3,रा. छत्रपतीनगर) असे मृत बालिकेचे नाव आहे. तर अनिल पवार आणि कविता अनिल पवार अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत.

सिग्नल बंदी होण्यापुर्वीच ट्रकची जारदार धडक
बीडबायपास परिसरातील छत्रपतीनगर येथील अनिल पाटील यांच्या नातेवाईकाचा विवाह पैठण तालुक्यातील नारायणगाव येथे रविवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी पवार कुटुंब चारचाकी वाहनाने निघाले होते. मात्र प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पवार यांनी त्यांची मोठी मुलगी अमृताला (6)अन्य नातेवाईकांकडे दिले आणि त्यांच्यासोबत लग्नाला येण्याचे तिला सांगितले. लहान मुलगी अनुष्का, पत्नी कविता यांना घेऊन ते सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुचाकीने(क्रमांक एमएच-20डीवाय 0134) नारायणगावला निघाले. बीडबायपास रोडने ते पैठणरोडकडे जात असताना संग्रामनगर उड्डाणपुल टी पॉईंट येथील वाहतुक सिग्नलवर त्यांच्या मागून सुसाट निघालेल्या ट्रकने(डब्ल्यू बी 23-डी 4257)त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर समोर बसलेली अनुष्का जागीच मृत्यू झाला आहे.