औरंगाबादेत भाजपाने सेनेला पछाडले

0

औरंगाबाद । सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने सेनेलाच पछाडले आहे.तो पहिला क्रमांकाचा पक्ष झाला आहे. जिल्हापरिषदेत पहिल्यांदाच भाजपला जिल्हापरिषद अध्यक्ष पद मिळवण्याची संधी असून, सेना भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली तरी आता भाजप मोठा पक्ष असल्याने जिल्हापरिषद अध्यक्षपदावर त्यांची दावेदारी असल्याने सेना त्यांना अध्यक्ष पद देणार का हा प्रश्न आहे. तर सेनेला जर सत्ता घ्यायची असेल तर काँग्रेसची हात मिळवणूक करावी लागेल त्यामुळे येणार्‍या काळात सेनेची भूमिका महत्वाची असणार आहे.

येणार्‍या काळात सेनेची भूमिका महत्वाची
त्याचबरोबर 62 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप 23, सेना 18, काँग्रेस 16, राष्ट्रवादी 3, मनसे 1 तर अपक्ष 1 असा विजयं मिळाला. 2012 च पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस 18, राष्ट्रवादी 10, शिवसेना 15, भाजपा 6, मनसे 8, अपक्ष 3 अस होत. मात्र भाजपने 17 जागा अधिकच्या जिंकल्या तर सेनेने 3 जागा अधिकच्या जिंकल्या असल्या तरी जिल्ह्यात सेना आणि भाजपाने सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे मतदान आपल्या पारड्यात पाडत जोरदार मुसंडी मारली आहे.

भाजपला लातूरमध्ये स्पष्ट बहुमत
काँग्रेसचा 25 वर्षापासून बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत देत लातूरकरांनी भाजपला नवे कारभारी नेमले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.आतापर्यंत 33 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या एकुरगा गटातून धीरज विलासराव देशमुख विजयी तर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर पराभूत झाले आहेत. भाजप 42 काँग्रेस 10 राष्ट्रवादी 4 शिवसेना 1 अपक्ष 1