औरंगाबादमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0

औरंगाबाद : शहरामध्ये एका १८ वर्षांच्या तरुणाने गळफास घेवूनआत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गणेश नायके असे या तरुणाचे नाव असून महिनाभरावर परीक्षा आली असताना त्याने आत्महत्या केली. दरम्यान परीक्षेच्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबाद मध्ये सिडको एन-२ येथील तोरणागड नगरमध्ये गणेश नायके हा तरुण राहतो. गणेशने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेशचे वडील पोलीस कर्मचारी आहेत. गणेश हा अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी आहे. परीक्षेच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.

Copy