ओवेसींनी भाजपकडून 400 कोटी घेतले!

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये मुस्लीम मतांच्या विभाजनासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून 400 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप होत असताना दिग्विजयसिंह यांनी हा गंभीर आरोप करुन खळबळ उडवून दिली. बिहार निवडणुकीदरम्यान अमित शहा आणि ओवेसी यांच्यात गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत ओवेसी यांनी 400 कोटी रुपये घेतले होते. असेच निवडणुकीत झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.