Private Advt

ओबीसी आरक्षण रद्दला केंद्रातील मोदी सरकारच जवाबदार

काँग्रेसचे भुसावळ विभागात आंदोलन : केंद्रातील मोदी सरकार जुलमी : पदाधिकार्‍यांची घोषणाबाजी

भुसावळ : ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील भाजपा सरकारच जवाबदार असल्याचा ठपका ठेवत भुसावळातील स्थानिक काँग्रेस पदाधिकार्‍यांनी यावल रस्त्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करीत मोदी सरकारविरोधात तसेच माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, भुसावळ विभागातील मुक्ताईनगरसह यावल येथेही काँग्रेस पदाधिकार्‍यांनी आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन दिले.

भुसावळात काँग्रेसचे आंदोलन
भुसावळ :
शहरातील काँग्रेसच्या आंदोलनात भुसावळ शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभाग, काँग्रेस कमेटी, अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस. महिला काँग्रेस कमेटी पदाधिकार्‍यांसह काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान खान, सलीम गवळी, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ, महिला काँग्रेस अध्यक्ष यास्मीन बानो, शहर उपाध्यक्ष विलास खरात, राणी खरात, हमीदा गवळी, राजु डोंगरदिवे, महेंद्र मसाले, जॉनी गवळी, शैलेश अहिरिे, रमजान खाटीक, सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

मुक्ताईनगरात काँग्रेस पदाधिकार्‍यांनी घेतली शपथ
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहर व तालुका काँग्रेसतर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने प्रवर्तन चौकात शनिवारी शाहू, फुले, डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जुलमी मोदी सरकारच्या विरोधात त्यांच्या अघोषित आणिबाणीविरुद्ध शपथ घेण्यात आली. निवडणूक आयोग न्यायव्यवस्था, माध्यमे यांचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचे चुकीचे धोरण केंद्र सरकार राबवित असल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घटनेतील लोकशाही मूल्ये जोपासण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, शरद महाजन, दिनेश पाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, अ‍ॅड.अरविंद गोसावी, भाऊराव महाजन, व्ही.आर.महाजन, प्रा.सुभाष पाटील, अ‍ॅड. राहुल पाटील, रमेश बारी, निखील चौधरी, राजू जाधव, युवक विधानसभा अध्यक्ष निरज बोराखेडे, निलेश भालेराव, राजू वानखेडे, लुकमान खान, फारूक खान, अनिल सोनवणे, आनंदा कोळी, अमोल जैन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावलला काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
यावल :
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठीय ावल तालुका काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे आणि इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावल शहरात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या सूचनेवरून व महाराष्ट्र उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात यावल तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनिल जंजाळे, संदीप प्रभाकर सोनवणे, अजय बडे, शेख नईम शेख खाटीक, अकबर शहा, कलीम शेख, अशपाक शहा, अभिषेक इंगळे, नाना तायडे, इमरान पैलवान, नदीम भाई, समाधान पाटील, पुंडलिक बारी, राजू बारी, अविनाश बारी, विकी गजरे, उस्मान खाँ, कलीम खान, जावेद मेंबर, मनोहर सोनवणे, बशीर तडवी, नसीर शेख आयुब भाई, गोल्डन भाऊ आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले.