Private Advt

ओबीसी आरक्षण : भुजबळ-फडणवीस यांच्यात बैठक

मुंबई – राज्याचे ज्येष्ठ मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच राजकीय आरक्षण कसं टिकवायचं याबाबत चर्चा झाल्याचे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षण परत मिळवणं शक्य असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.

ओबीसी आरक्षण हा राजकीय प्रश्न नाही, किंवा त्याचं आम्हाला राजकारणही करायचं नाही. मराठा आरक्षणावेळी आम्ही कशारितीने इम्पेरियल डेटा जमा केला, जो सर्वोच्च न्यायलयानेही ग्राह्य ठरवला, आताही आपल्याला तो कसा जमा करता येईल, हे मी छगन भुजबळ यांना सांगितलं. ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मी तुमच्यासोबत काम करेल, सत्तारुढ पक्षाला नेतृत्व करावं लागतं. त्यामुळे तुम्ही नेतृत्व करा आम्ही सहकार्य करू, गरज पडल्यास मी नोट्सही काढून देतो, असे फडणवीस यांनी म्हटले. सध्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, फेब्रुवारी महिन्यात मेजर निवडणुका होणार आहेत. त्याअगोदर, हे सगळं करणं आवश्यक आहे, ते होऊ शकतो, असेही फडणवीस यांनी सांगितलं.