ओडीएचा पाणी पुरवठा सुरळीत

0

बोदवड । तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. गतवर्षी मात्र परतीच्या पावसाने साथ दिल्याने तालुक्यात यंदा टंचाईची तीव्रता कमी आहे. त्यातल्या त्यात अपवाद वगळता ओडीए योजना सुरळीत असल्याने नियमित पाणीपुरवठा होताना दिसतो. सारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील नवीन पंपात तांत्रिक दोष निर्माण झाला होता. मात्र, दुरुस्तीनंतर ही समस्या सुटून पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.