ओएलएक्सवर सायकल विकायला गेला अन् झाली २८ हजारात फसवणूक

0

जऴगाव :- ओएलएक्सच्या माध्यमातुन साय़कल विक्री करण्याच्या नादात सूरज महेंद्र पाटील वय २१ रा भूषण कॉलनी या तरुणाची २८ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली .

सुरज हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने बारा हजार रुपयांची जीम की सायकल खरेदी केली होती. ही सायकल विक्री करायची असल्याने त्याने सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ओएलएक्स या साइटवर सायकलचे छायाचित्र अपलोड करुन जाहिरात टाकली. जाहिरात टाकताच सूरजला राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. त्याने सायकल खरेदी करायचे असून तुम्हाला पाठवलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा त्यानंतर तुम्हाला संबंधित सायकलची रक्कम मिळेल असे सांगितले. सूरजने क्यूआर कोड स्कॅन करताच त्याच्या बँकेच्या खात्यावरुन अर्ध्यातासाच्या अंतरात दोन वेळा तीन हजार व दोन वेळा ११ हजार याप्रमाणे एकुण २८ हजार रुपये काढण्यात आल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले. पैसे परत करण्याच्या बहाण्याने सूरजला संबंधितांचे फोन येत आहेत. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सूरजने तक्रारीसाठी रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठले आहे.

Copy